कोल्ही गाव स्वतंत्र घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी....
ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी....


पनवेल दि १७, (वार्ताहर) : कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी खा. श्रीरंग बारणे यांच्याकडे  निवेदनाद्वारे  केली आहे.
                सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह, हितेश नाईक, साहिल नाईक आदींनी खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना सरपंच  अहिल्या बाळाराम नाईक यांच्या मागणीचे हे पत्र दिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि ग्रुपग्रामपंचायत पारगाव ता. पनवेल हद्दीत कोल्ही हे गाव आंतरराष्ट्रीय विमानतळात मोडत असल्याने त्याचे पुनर्वसन झाले आहे. सदरचे पुनर्वसन वडघर हद्दीतील झाले आहे. तरी सदरचे कोल्ही गाव म्हणून घोषित करावे व त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी ग्रामसभा ठराव प्रत सुद्धा जोडली आहे. या निवेदनाची खा. श्रीरंग बारणे यांनी दखल घेत या मागणी संदर्भात  स्वतःचे पत्र तयार करून ते मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल  व पाठपुरावा केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले आहे. 



फोटो - खा. श्रीरंग बारणे यांची बाळाराम नाईक यांनी घेतली भेट
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image