भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
पनवेल / प्रतिनिधी : -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न करण्यात आला.
या महोत्सवाची सुरुवात पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीने अतिशय जल्लोषामध्ये व हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली . सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, मिरवणुकीची सांगता डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या प्रांगणामध्ये झाली.या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
सदर कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक रवी जाधव यांच्या ऑर्केस्ट्राने भीम गीतांचा अतिशय सुमधुर असा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व उपस्थित भीमसैनिकांना भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल तालुका व पनवेल शहर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने करण्यात आले होते. भीम जयंती महोत्सव संपन्न होण्याकरिता २२ मार्चपासून गावोगावी आमंत्रणे पाठवून करण्यात आली होती. जयंतीचा संपूर्ण खर्च हा गावागावातील भीमसैनिकांनी दिलेल्या धम्म दानातून करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ज्येष्ठ नेते नरेंद्र गायकवाड पनवेल,विजय गायकवाड पनवेल, महेश साळुंखे वडघर, सचिन कांबळे काळुंद्रे, सचिन रमेश कांबळे शिवकर, प्रवीण खंडागळे पोयंजे, ज्येष्ठ बौद्धाचार्य हिरामण जोशी गुरुजी विचुंबे, राहुल गायकवाड काळुंद्रे, नितीन कांबळे आदई यांनी गेले महिनाभर अतिशय परिश्रम घेतले होते. भीम जयंती महोत्सव अतिशय उत्साह पूर्ण आणि यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल सर्व आयोजक कार्यकर्त्यांचे आंबेडकरी अनुयायांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.