मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
'मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....

पनवेल / प्रतिनिधी  : - पनवेलकरांच्या सन्मानात आणखी एका मोठ्या सन्मानाची भर पडते आहे. पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे उंचावेल केवळ पनवेलचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची मान.

सामान्य परिवारातील होतकरू,एक जबाबदार फूटबॉल कोच मास्टर ब्रुशद मेटांगे मिस्टर इंडिया फायनल ( पुरुष सौंदर्य ) प्रतियोगिते मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार  प्रतिनिधित्व करणार आहे.
रुबरू च्या 2026, Mr INDIA या प्रतियोगिते मध्ये ब्रुशद मेटांगे यांची निवड झाली असून ही फायनल 2 मे 2026 ला गोवा येथे आयोजित केली आहे..

ब्रुशद एक सुसंस्कृत, सुसभ्य व आदर्शवादी व्यक्ती आहे आणि हा वारसा वडील लाईफ कोच बाळासाहेब(कुमार) मेटांगे यांच्याकडूनच त्याला मिळाला आहे.वडील कुमार मेटांगे यांनी ब्रुशद ला एक जीवनोपयोगी मंत्र दिला की संघर्षमय यात्रा ही एक दिवस सागरा एवढं यश नक्की देते.तेव्हा ब्रुशद हा पनवेलकरांचा मान ठेऊन महाराष्ट्राची शान बनून या रुबरू 2026 च्या मिस्टर इंडिया फायनल मध्ये आपली योग्यता व प्रतिभा सिद्ध करणार आहे.
आपण सगळ्यांनी, अवघ्या महाराष्ट्राने त्याला इन्स्टा वर लाईक , कमेंट्स , शेअर आणि फॉलो अवश्य करा. विसरू नका..तुमचं लाईक, कमेंट्स वोट म्हणून गृहीत धरलं जाणार असल्याने, सहकार्य करण्याचे आवाहन त्याने यावेळी पनवेलकरांना केले आहे. 
@brushad.metange
Comments