पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...


नवी मुंबई / प्रतिनिधी : - 
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (PDGPA) रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल ताज विवान्ता, तुर्भे येथे १०० व्या  वैद्यकीय परिषदेचे' (CME) परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूरउपस्थित होते. तसेच पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, डॉ.आनंद गोसावी डॉ.अपर्णा पवार आणि संस्थेचे मानद सल्लागार डॉ. गिरीश गुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभ पार पडला.
मा.रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात  PDGPअसोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले आणि समाजाच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.वैद्यकीय व्यवसाय हा केवळ एक व्यवसाय नसून, समाजाप्रती सेवा, समर्पण आणि वचनबद्धतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती मनःपूर्वक प्रशंसा आणि कृतज्ञता व्यक्त केली. सर्व मान्यवरांनी उपस्थित डॉक्टरांना संबोधित केले व संघटचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
संघटनेचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांनी उपस्थितांना संघटनेचे सामाजिक एवं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान विस्तृतपणे सांगितले. डॉ वसंत पाटील,पनवेल यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार, आणि शंकरा नेत्र रुग्णालयाचे डॉ.राजेश कापसे याना यावेळी गौरविण्यात आले.या परिषदेला असोसिएशनचे २५० पेक्षा जास्त सभासद डॉक्टर उपस्थित होते.विविध विषयांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत माहितीपूर्ण व्याख्याने दिली. याद्वारे उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातील नवीन बदल आणि उपचार पद्धतींविषयी सखोल माहिती मिळाली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.या विशेष कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ मिलिंद टिपणीस यांनी केले.
डॉ अमित दवे यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेचे आयोजन अध्यक्ष .डॉ आशिष गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आयोजन समिती, कोअर कमिटी, बोर्ड कमिटी सदस्यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाची धुरा सांभाळली.

पनवेल परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी अशा प्रकारच्या  अद्ययावत शैक्षणिक चर्चासत्रांची मोठी मदत होते, असा विश्वास या प्रसंगी डॉक्टरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व डॉक्टरांनी या उपक्रमाचे आणि संघटने मनापासून कौतुक केले.
Comments