सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला बँको पुरस्कार २०२३ प्रदान ; संचालक डॉ.श्रीकृष्ण परब यांनी स्वीकारला सन्मान...
संचालक डॉ.श्रीकृष्ण परब यांनी स्वीकारला सन्मान...


मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबईला आणखी एका मानाचा पुरस्कार  देण्यात आला आहे. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत  सहकारी बँका गटात  सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम केल्या बद्दल या बँकेला 'बँको ब्लु रिबन' पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग सहकारी  बँकेचे संचालक व मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण द. परब यांनी दमण येथे सदर पुरस्कार स्वीकारला.                            अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सदर पुरस्कार दिले जातात. देशातील सात राज्यांमधून  सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला "बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३" जाहीर करण्यात आला.  देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बँकेचे सर्व संचालक , अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची  प्रतिक्रिया डॉ श्रीकृष्ण द. परब यांनी  व्यक्त केली.

फोटो: दमण येथे बँको ब्लु रिबन' हा पुरस्कार रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते स्वीकारताना सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे संचालक डॉ. श्रीकृष्ण द. परब बाजूला अन्य मान्यवर
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image