मा.नगरसेवक नितीन पाटील यांचा पाठपुरावा..
पनवेल / प्रतिनिधी - : पनवेल महापालिका प्रभाग क्र १८ मधील स्वामी नित्यानंद मार्ग, गार्डन हॉटेल ते पनवेल महापालिका भवन काँक्रीटिकरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रुंदीकरण, पावसाळी गटारांचे बांधकाम, फूटपाथ बांधणे तसेच इतर संलग्न कामांचा (सुमारे ७ कोटी १४ लाख) भूमीपूजन सोहळा माजी सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अभिनव युवक मित्र मंडळ नाका येथे पार पडला. सदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मा नगरसेवक नितीन जयराम पाटील सतत पाठ पुरावा करत होते. आणि हे कामाचे भूमिपूजन म्हणजे त्यांच्याच पाठपुराव्याची पोचपावती असल्याचे मा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक ऍड.प्रकाश बिनेदार, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, शहर चिटणीस रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, विजय डिसोझा, मयूर चिटणीस, राजा चव्हाण, शैलेश कदम, राजू सावंत, सचिन नाझरे , जयेश शहा , भाऊसाहेब पाटील, दिवेकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.