जॉय ऑफ गिव्हिंग सप्ताह उत्साहात साजरा..
स्कूल दातृत्वाच्या आनंदाने ऑर्किडियन्सनी चिल्ड्रन ऑफ साहसी एम्बर्सच्या सहाय्याने साजरा केला जॉय ऑफ गिव्हिंग सप्ताह.
पनवेल,ता.11 - ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या सीवूड्स शाखेच्या वतीने शनिवारी ( ता.7) रोजी एक प्रेरणादायी दिवस म्हणून एकता, सर्जनशीलता आणि सहानुभूतीच्या मूल्यांभोवती गुंफलेल्या एक्सपलोरीका या भव्य वार्षिक सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.जॉय ऑफ गिव्हिंग अर्थात देण्याच्या आनंदात दडलेल्या सखोल जीवनमूल्यापासून प्रेरणा घेणारा आणि नृत्य, दृश्यकला, संगीत, पॉटरी या कलांतील असामान्य प्रतिभाविष्कारासह क्रीडा आणि विद्यार्थी तसेच पालकांच्या सक्रिय सहभागासाठी प्रसिद्ध असलेला एक्सपलोरीका हा वार्षिक सोहळा केवळ मनोरंजनाच्या पलीकडचे बरेच काही देऊन गेला. साहसी एम्बर्स या नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मानवतावादी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी केलेल्या प्रेरणादायी सहयोगातून ऑर्किड्सने जॉय ऑफ गिव्हिंग अर्थात ‘दान उत्सव’ साजरा करण्यासाठी एक मंच निर्माण केला, जिथे देण्यातील आनंद सर्व ऐहिक आनंदाच्या पार घेऊन जाणारा ठरला.
साहसी एम्बर्स या स्वयंसेवी संस्थेशी साधलेल्या सहयोगातून ऑर्किड्सची एका व्यापक समाजामध्ये सकारात्मक बदलांना खतपाणी घालण्याशी असलेली अचल बांधिलकी अधोरेखित होते. एक्सपलोरिका निमित्ताने ऑर्किड्सच्या विद्यार्थ्यांची विविधांगी प्रतिभा आणि कलाध्यास यांचे प्रदर्शन घडविण्याच्या बाबतीतच नव्हे तर मुलांमध्ये सामाजिक जबाबदारीचे सखोल भान रुजविण्याच्या दृष्टीने एक मैलाचा टप्पा गाठला. या कार्यक्रमामध्ये फुटबॉल सामने, स्केटिंग, जम्पिंग कॅसल, टॉय ट्रेन, बोलिंग टर्फ, मैदानी उपक्रम, बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम आणि जादूचे प्रयोग अशा कितीतरी उपक्रमांचा रंगबिरंगी पट विणला गेला.
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, मुंबईच्या व्ही. पी. अकॅडेमिक्स कवीता चॅटर्जी म्हणाल्या, “EXPLORICA हा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची आणि वंचित गटातील लोकांच्या आयुष्यात ठोस बदल घडवून आणण्याची अनोखी संधी मिळवून देतो. हा उपक्रम त्यांच्या वाढीला खतपाणी पुरवितो व त्यांच्यातील सर्जनशीलता आणि सामाजिक जाणिवेची जोपासना करतो. साहसी एम्बर्सबरोबरच्या सहयोगासाठी आम्ही कृतज्ज्ञ आहोत आणि या उदात्त कार्यासाठी अधिक अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करण्यास उत्सुक आहोत. आजच्या काळामध्ये, जिथे सर्वकाही स्पर्धात्मकतेच्या भोवती फिरत आहे, तिथे आपल्या मुलांच्या मनावर दातृत्वाचे मूल्य आयुष्यभरासाठी बिंबविणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. साहसी एम्बर्ससोबत आम्ही आयोजित केलेल्या जॉय ऑफ गिव्हिंग सोहळ्यामुळे आमच्या मुलांना आपल्या सुदैवाचे सखोल भान आले व त्यातून तरुण वयातच त्यांच्या मनामध्ये नैतिक मूल्यांचा भक्कम पाया रचला गेला.
साहसी एम्बर्सचे सहसंस्थापक आणि विश्वस्त श्री. गाय रॉड्रिग्युज म्हणाले, “ऑर्किड्सच्या EXPLORICA आणि जॉय ऑफ गिव्हिंग सप्ताहाचा एक भाग बनल्याचा आम्हाला आनंद आहे. साहसी एम्बर्सच्या मुलांनी आजच्या सर्व उपक्रमांचा मनापासून आनंद घेतला. आमच्या मुलांनी इथल्या अॅस्ट्रोलॉजी लॅबला भेट दिली व अवकाशातील नेत्रदीपक घडामोडी पाहिल्या तो या दिवसातील सर्वात विशेष क्षण होता. मुलांना हा अनुभव एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. त्याचबरोबर ऑर्किड्सच्या मुलांबरोबर घालविलेला वेळ, त्यांच्याशी साधलेला संवाद यामुळे आमच्या मुलांच्या मनात आशेचा किरण जागा झाला.”
आनंद हा दिल्याने द्विगुणित होतो हे खरेच आहे. ऑर्किडियन्सनी जॉय ऑफ गिव्हिंग उपक्रमासाठी साहसी एम्बर्सशी हातमिळवणी केली, ज्यातून समाजाचे ऋण फेडण्याचे व आपल्याइतके सुदैवी नसणाऱ्यांप्रती दातृत्व दाखविण्याचे महत्त्व प्रदर्शित झाले.