पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रशासन विभागाचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी स्वीकारला...
पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी स्वीकारला...


पनवेल दि.२० (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यातील प्रशासन विभागाचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर स्वीकारला आहे. 
                 पनवेल शहर पोलीस ठाण्यातील प्रशासन विभागातील पदभार पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनंतर पासून रिक्त होते. सदर ठिकाणी मुंबई येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांची बदली नवी मुंबई पोलीस मुख्यालयात झाल्याने त्यांची बदली पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी आपल्या प्रशासन विभागीय निरीक्षक विभागाचा पदभार स्वीकारला. त्यांना आता पर्यंत पोलीस खात्यातील विविध क्षेत्राचा अभ्यास असून लोहमार्ग पोलीस ठाण्यात काम करताना करावा लागणारा विविधांगी तपासाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात काम करताना याचा फायदा त्यांना होणार आहे.फोटो : प्रविण भगत
Comments