टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याच्या बहाण्याने तरुणीला ४ लाख १३ हजाराचा गंडा..
 तरुणीला ४ लाख १३ हजाराचा गंडा..

पनवेल दि.२० (संजय कदम) : टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याच्या बहाण्याने तरुणीला ४ लाख १३ हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               कामोठे येथे राहणाऱ्या तरुणीसोबत हा प्रकार घडला असून याप्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार केली आहे. यूट्यूबवरील व्हिडीओला लाइक करून पैसे कमवा असा मेसेज तिला मोबाइलवर आला होता. त्याठिकाणी टास्कच्या लिंकला ती प्रतिसाद देत गेल्यानंतर तिला सुरुवातीला काही प्रमाणात नफ्याची रक्कम देण्यात आली. यामुळे तिचा टास्कमधून पैसे मिळत असल्याचा विश्वास बसताच तिच्याकडे पैशाची मागणी होत गेली. त्याद्वारे तिने तब्बल ४ लाख १३ हजार रुपये भरल्यानंतर देखील अधिक पैसे मागितले जाऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या निदर्शनात आले. यावरून तिने कामोठे पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments