विद्यार्थीनींनीं पोलिसांना बांधली राखी ; के. ई. एस स्कूलचा उपक्रम..
विद्यार्थीनींनीं पोलिसांना बांधली राखी ; के. ई. एस स्कूलचा उपक्रम..

पनवेल/प्रतिनिधी :--
बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील.भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र नुकताच पनवेल येथील कोकण एज्युकेशन इंग्लिश मिडीयम इंदुबाई वाजेकर हायस्कूलच्या विध्यार्थीनींनीं पनवेल शहर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधून अगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला.

अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानून त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी पनवेल शहर पोलिस ठाण्यात रायगड स्काउट गाइडच्या माध्यामातून को. ए.सो.इंदूबाई आ.वाजेकर इंग्रजी माध्यम शाळा, पनवेल मधील विद्यार्थिनींनी नुकताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह अधिकारी, व  पोलिस कर्मचार्‍यांना राखी  बांधून रक्षाबंधन हा आगळावेगळा सण साजरा केला. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस   निरीक्षक नितीन ठाकरे, रायगड स्काउट गाइड  विभागाच्या सोनाली राठोड, पोलिस कर्मचारी, स्काउटर, गाइडर उपस्थित होते.
Comments