पनवेल पिल्लई युनिव्हरसिटी मध्ये 'अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई' चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला
पनवेल (प्रतिनिधी)
अलेग्रिया निमित्त पनवेल पिल्लई युनिव्हर्सिटी पनवेल येथे गुरुवारी मराठी चित्रपट "अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई " चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला आली होती.
यावेळी "अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई" प्रमोशनचा देखणा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटाचे मुख्य कलाकार प्रार्थना बहिरे, दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मिती सना शिंदे या उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सासू-सुनेच्या या कथेला भावनिक किनार उत्तम दिली आहे. सासू आणि सुनेचे वेगवेगळे पैलू मांडताना त्यांच्यातील नात्याला कुठे तडा जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्यांच्या नात्यातील रुसवे-फुगवे, त्यांच्यातील चढाओढ आणि टोमणे तसेच त्यांच्यातील शाब्दिक संघर्ष मांडताना त्या नात्यातील भावभावना आणि गोडवा जपण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणेकर आदी कलाकारांनी या कथानकाला आपल्या उत्तम अभिनयाची छान जोड दिली आहे. विशेष म्हणजे, निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे यांनी आपापल्या व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत. संपूर्ण चित्रपट त्यांनी आपल्याच खांद्यावर घेतला आहे. सासू आणि सुनेतील रुसवे-फुगवे, एकमेकींमधील चढाओढ आणि संघर्ष तसेच भावभावना व हळवे प्रेम त्यांनी सुंदररीत्या सादर केले आहेत.चित्रपट या आधीच सिनेमागृहात हाऊसफुल सुरु असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर कलाकारांनी आपल्या चित्रपटाविषयी अनुभव मांडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कलाकारांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणी शेअर केल्या आणि प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट आवडेल असा विश्वास व्यक्त केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चित्रपटातील गाण्यांवर प्रार्थना बेहरे सह ठेका धरत वातावरण प्रफुल्लीत केलं.
याप्रसंगी पिल्लई महाविद्यालयाच्या संचालक - पीआर, पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, डॉ. निवेदिता श्रेयन्स, डॉ. संदीप जोशी, प्राचार्य, पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय डॉ. गजानन वाडेर, प्राचार्य, पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय प्राचार्य संदीप जोशी, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.