रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
     दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न... 


पनवेल दि २४( संजय कदम)  :  रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर तालुका पनवेल येथे दप्तरवीना शाळा उपक्रम अंतर्गत प्लास्टिक कचरा मुक्त उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे होते.
                  कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापक तसनिम मुल्ला यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. प्लास्टिक कचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने न विल्हेवाट लावल्यास तो जमिनीवर व पाण्यात साठतो आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते.यानंतर शाळेच्या शिक्षक समीर सय्यद,असलम कौचाली,परवीन खान यांनी प्लास्टिक मुक्त करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. प्लास्टिक कचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने न विल्हेवाट लावल्यास तो जमिनीवर व पाण्यात साठतो आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते.शाळेच्या विषय शिक्षिका अंजुम समीर सय्यद यांनी  विद्यार्थ्यांना कागदी व कपडाचे पिशव्या कश्या प्रकारे तयार करू शकतात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांकडून कागदी व कापडी पिशव्या तयार करून घेण्यात आल्या. व कागदाचे पिशव्या शाळेच्या मुख्याध्यापक यांना भेट देण्यात आल्या.शेवटी मुख्याध्यापक तसनिम मुल्ला यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनात प्लास्टिक च्या पिशव्या न वापरण्याबाबत सूचना केल्या.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटून आले. विद्यार्थ्यांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करण्याचा संकल्प केला.

कोट -

विद्यार्थी अब्दुल रज्जाक म्हणाले, "मला या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळाले. आता मी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करेन."
विद्यार्थी फरहाणा म्हणाली, "प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे. आपण सर्वांनी प्लास्टिक मुक्त जीवनशैली अंगीकारली पाहिजे."
शिक्षक समीर सय्यद म्हणाले, "हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक चांगला प्रयत्न होता."


चौकट - 
या उपक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक प्रभावी बनवता येईल.
या उपक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, NGOs, आणि इतर संबंधित संस्थांचा सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक व्यापक बनवता येईल.
या उपक्रमाचे आयोजन नियमितपणे करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात मदत होईल.
फोटो -   जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर प्लास्टिक कचरा मुक्त उपक्रम
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image