तलावात बुडून मुलाचा मृत्यू...
        तलावात बुडून मुलाचा मृत्यू...


पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) :  तळोजा गावातील तलावात मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिल रफिक खान (वय ७) असे मृत मुलाचे नाव आहे.
                 गणपती आगमनामुळे तळोजा तलाव सुशोभीकरणाचे काम बंद होते. त्यामुळे गावातील मुले तलावात पोहत होती. काही वेळाने मुले पोहून घरी गेली; मात्र एका मुलाचे चप्पल आणि कपडे त्याच ठिकाणी पडून असल्यामुळे नागरिकांना शंका आली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी फारूक पटेल यांनी तळोजा पोलिस आणि अग्निशमन जवानांना माहिती दिली. त्यानंतर गावातील तरुणांनी पोलिसांच्या उपस्थितीत साहिलचा मृतदेह बाहेर काढला.
Comments