पाणी टंचाईच्या काळात पनवेल मधील तलाव, बोअरवेल,विहिरी मधील पाणी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात पनवेल शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरपालिकेला निवेदन..
पनवेल शिवसेनेचे महानगरपालिकेला निवेदन..
पनवेल / प्रतिनिधी :-
पनवेलकर पाणी टंचाईची प्रचंड झळ अनेक वर्षांपासून सोसत आहेत,सत्ताधाऱ्यांनी देखील त्याचे निरसन न करता पनवेलकरांच्या तोंडाला पाने पुसली असून आपल्या मालकीचे असलेले देहरंग धरणाचा गाळ काढून देखील त्याचा यथा योग्य वापर होताना दिसत नाही त्यामुळे प्रशासन हाच एकमेव मार्ग असल्याने पनवेल मधील तलाव, विहिरी, बोअरवेल यातील पाणी योग्य ती शुद्धीकरण प्रक्रिया करून पनवेलकरांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देऊन पनवेल लवकरात लवकर टँकरमुक्त करावे यासाठीचे निवेदन पनवेल शहर शिवसेने तर्फे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांना  आज देण्यात आले.तसेच यासाठी लागणारा पाठपुरावा देखील करण्याची तयारी पनवेल शिवसेनेने दाखविली आहे.

यावेळी पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, पनवेल शहर संघटक राकेश टेमघरे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते,उपमहानगर संघटक अच्युत मनोरे,महिला संघटिका अर्चना कुळकर्णी, मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे, सुजन मुसलोंडकर, सनी टेमघरे,प्रशांत नरसाळे, निखील भगत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments