युवा सेनेच्या रायगड जिल्हा युवा अधिकारीपदी पराग मोहिते यांची नियुक्ती...
युवा सेनेच्या रायगड जिल्हा युवा अधिकारीपदी पराग मोहिते यांची नियुक्ती...

पनवेल / प्रतिनिधी :- 
शिवसेना पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हा युवा संघटनेचे नेतृत्व आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पराग मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 
त्याबद्दल रायगडचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख व मा. आमदार मनोहरशेठ भोईर, तसेच जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांनी पराग मोहिते यांचे अभिनंदन केले. युवकांना घेऊन चालणाऱ्या आणि चांगल्या पद्धतीने संघटन कौशल्य हाताळणाऱ्या युवकाला पक्षाने ही जबाबदारी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

आधी विद्यार्थी सेना व नंतर युवासेनेच्या स्थापनेपासून पराग मोहिते सातत्याने पक्ष संघटनेसाठी कार्यरत आहेत. युवकांची कॉलेजमधील संघटन बांधणी, कॉलेजमधील निवडणुका, पनवेल विधानसभेमधील युवकांचे संघटन, विविध स्थानिक आंदोलन, पक्षाने सोपवलेले कार्यक्रम विविध मेळावे आणि सरकार विरोधातील आंदोलन यात पराग मोहिते यांना सातत्याने अग्रेसर राहिलेले पक्षाने पाहिले आहे.

 नियुक्ती बद्दल पराग मोहिते यांनी बोलताना सांगितले की  "शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे कुटुंबप्रमुख उद्धवजीसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई तसेच जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवून येणाऱ्या काळात तीनही विधानसभांमध्ये युवासेना बांधणी भक्कम करण्याच आणि पक्षाचा जोरदार प्रचार करण्याचे वचन त्यांनी दिले आहे..
Comments