शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांची उपजिल्हा रुग्णालयावर धडक ; ५३ थकीत कामगारांचे वेतन जमा..
       ५३ थकीत कामगारांचे वेतन जमा..


पनवेल / वार्ताहर :- 
जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर पांचाळ आणि शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्यामध्ये अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

याबाबतीचे सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेनेचे पनवेलचे स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, पोलिसमित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन अनेक  गोष्टी जाणून घेतल्या. 
प्रथमतः त्यांनी हिवताप आणि डेंग्यूचे पेशंट असलेल्या वॉर्ड मध्ये भेट देऊन तिथे उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांशी चर्चा करून तेथील वैद्यकीय उपचारा संदर्भात डॉ. सकपाळ यांच्याशी चर्चा केली. विशेष आनंदाची बाब म्हणजे गेल्या साधारणपणे एक महिन्यामध्ये सदर रुग्णालयात पन्नासहून अधिक डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण दाखल झाले होते. त्या सर्वांवर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करून त्या सगळ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या दोन्ही ठिकाणी आठ  ते दहा रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालय  पनवेल मधील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरत असून रुग्णांची अत्यंत चांगली काळजी  घेतली जात असून पनवेल मधील रुग्णांनी या रुग्णालयातील सेवेचा लाभ करून घ्यावा असे आवाहनही  सोमण यांनी केले आहे.  चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. रुग्णालयामधील नादुरुस्त अवस्थेत असलेली  शवागार, (mortuary), रुग्णालयाचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, औषधांची कमतरता, शस्त्रक्रियेसाठी लागणारी विविध उपकरणे यांची आवश्यकता, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तुटवडा, वॉर्डबॉय, त्याचप्रमाणे तेथील कामावरती असलेल्या 53 कंत्राटी कामगारांचा थकीत पगार इत्यादी विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले.  
 
या बैठकीमध्ये त्यांच्याबरोबर डॉ. मधुकर पांचाळ यांच्यासह हिवताप आणि डेंग्यू, मलेरिया जनजागृतीचे म्हणजे आयसीएमचे डॉक्टर एलीन जयकर, डॉ. सकपाळ त्याचबरोबर तेथील विकास कोंपले तसेच इतर अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. 
रुग्णालयात येणाऱ्या बेवारस मृतदेहांमुळे शवागराची दुरवस्था होते व इथे दुर्गंधी पसरते अशी तक्रार केल्यानंतर सोमण यांनी यासंबंधी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवून याच्यातून सविस्तर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.तसेच अजून अतिरिक्त शवागार उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सोमण यांनी मान्य केले. 
चंद्रशेखर सोमण यांचे  रुग्णालय उभारणीमागे मोलाचे योगदान असून रुग्णालय उभारल्यानंतर सुद्धा त्यांनी विस्टा फुड्स या त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडातून श्वानदंशावर व ईतर  औषधांसाठी रुपये ५ लाख रुपयांची मदत  त्याचबरोबर टिळक रोड मित्र मंडळातर्फे लोक सहभागातून त्यांनी यापूर्वीही दोन शावापेटीका फेब्रुवारी २०२० मध्ये कार्यान्वित करून दिल्या आहेत.
 इथे काम करणाऱ्या एकूण ५४ कामगारांना गेले तीन महिने कंत्राटदाराकडून पगारच मिळालेला नव्हता. याची चौकशी केली असता ऑगस्ट महिन्यापर्यंतचा पगार जमा झाला असून लवकरच संबंधित कामगारांच्या खात्यात थकीत पगाराचे पैसे जमा व्हावे यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सोमण यांनी केला. व त्याप्रमाणे आज सर्व कंत्राटी कामगारांच्या खात्यात पैसे जमा झाले. येणाऱ्या पुढील काळामध्ये इथे येणाऱ्या रुग्णांवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा बाकीच्या गोष्टी आम्हा पनवेलकरांवर सोडा,आम्ही सगळे एकत्रित मार्ग काढून शासनाचा आरोग्य विभाग आणि  सिव्हील सर्जन डॉ. अंबादास देवमाने यांच्याशी चर्चा करून सर्व प्रश्नांची तत्परतेने  दखल घेऊ असे आश्वासन सोमण यांनी दिले.
अशा प्रकारे चर्चा होऊन बरेच दिवसांनी कोणीतरी रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष घातल्याने वैद्यकीय अधीक्षकांसहित सर्व  डॉक्टरानी सोमण यांना धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले.
Comments