पराग बेडसे यांची भारतीय गुश्तिनगिरी संघटनेच्या मुख्य मार्गदर्शक पदी नियुक्ती..
 मुख्य मार्गदर्शकपदी नियुक्ती..


पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल येथील सुप्रसिद्ध अशा लाईफ लाईन हॉस्पिटलचे डायरेक्टर व साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे यांची भारतीय गुश्तिनगिरी संघटनेच्या मुख्य मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.गुश्तिनगिरी म्हणजे कुस्ती व ज्युदो सारखा खेळ प्रकार आहे , ताजिकिस्तान देशाचा राष्ट्रीय खेळ असून संपूर्ण जगात बहुताश देशात खेळला जातो. या खेळाची जगभरात चाहते आहे. व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या खेळाकडे आकर्षित गेला आहे.        लाईफ लाईन हॉस्पिटलचे डायरेक्टर व साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे यांची इंटरनॅशनल आशियाई गुश्तिनगिरी (कुस्ती) फेडरेशन संचलित भारतीय गुश्तिनगिरी संघटनेच्या मुख्य मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल पराग बेडसे यांचे सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. त्यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष, भारतीय गुश्तिनगिरी संघटना योगेश उंटवाल यांच्या हस्ते देण्यात आले. याबद्दल पनवेल लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील यांच्यासह इतर डॉक्टर, कमर्चारी वर्ग, नातेवाईक आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.फोटो: पराग बेडसे यांची भारतीय गुश्तिनगिरी संघटनेच्या मुख्य मार्गदर्शक पदी नियुक्ती
Comments