हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सुरक्षाराखी..

उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक.... 

पनवेल / वार्ताहर : -
वाहनचालकांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे समजावून यावर्षी रक्षाबंधन साजरा करण्यात आला. 
 ३१ ऑगस्ट २०२३ रोजी बहीण भावंडांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढवणारा रक्षाबंधन हा पवित्र सण सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे ७ वे वर्ष असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रांतिजोत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात, युवा व डेशिंग असे व्यक्तिमत्व सौ.रुपालीताई शिंदे या सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण झोकून विविध कार्यक्रम राबवत असतात, महिलांच्या समस्यांना सतत झटणाऱ्या रुपालीताई शिंदे यांनी यावर्षी देखील वाहतूक शाखेचे नियमन न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात येते. भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते त्याचप्रमाणे आम्हा फाउंडेशनच्या महिला नियम न पाळणाऱ्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण व्हावे, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी इच्छा व्यक्त करत हा रक्षाबंधनाचा पवित्र सण सालाबादप्रमाणे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन मार्फत साजरा करण्यात येतो, त्याच बरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील आम्ही फाउंडेशनच्या सर्व महिला राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिणींची कमी पूर्ण करतो अश्या पद्धतीने या उपक्रमाचे स्वरूप असते. 
यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील, तसेच पोलीस नाईक ज्ञानेश्वर पवार, पोलीस नाईक  प्रशांत भोईर, पोलीस शिपाई निलेश ठाकूर, महिला पोलीस  शिपाई बिराजदार, महिला पोलीस शिपाई तिबिले, क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष सौ. रूपालीताई शिंदे, खजिनदार स्नेहा धुमाळ, रसायनी विभागीय अध्यक्ष सौ. राधिका कोळीसह समाजसेविका रूपा सिन्हा तसेच इतर पत्रकार बंधू व सदस्य यांनी वाहनचालकांना सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सांगून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image