शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे)बेकायदेशीर व अवैध्य टॉवर विरोधात चिंध्रण ग्रामस्थांनी उभारलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला पाठिंबा...
    बेमुदत आमरण उपोषणाला पाठिंबा...


पनवेल दि ०१,(संजय कदम) :  तालुक्यातील चिंध्रण गाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना चिंध्रण व ग्रामस्थ मंडळ चिंध्रण यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण विस्तार व मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या बेकायदेशीर व अवैध्य टॉवर विरोधात गेल्या पाच दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फ़े  रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे पनवेल चे तहसीलदार विजय पाटील व इतर संबंधित शासकीय अधिकारी यांच्याशी  फोन द्वारे चर्चा करून तातडीने या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. 
         यावेळी  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फ़े  रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यासह  महानगर समन्वयक दीपक घरत, तालुका प्रमुख विश्वास पेठकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपशहर प्रमुख हरेश पाटील, ग्रामीण विभाग प्रमुख दत्ता फडके, अनिल तळवणेकर, युवा सेने उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विभाग अधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य मनोज कुंभारकर , मधुकर पाडेकर, शाखा प्रमुख महेंद्र पाटील आदींनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. व त्यांना जाहीर पाठिंबा देत आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन सुद्धा दिले.   



फोटो : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फ़े बेमुदत आमरण उपोषणाला दिला पाठिंबा
Comments