पनवेल महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना मालमत्ता करात सवलत देण्याची शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागणी...
शिवसेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे)मागणी....पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आधार देण्यासाठी त्यांच्या मालमत्ता करात सवलत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.
              विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासनातर्फे निराधार वंचित महिला-पुरुष यांना आधार म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सवलत योजना दिल्या जातात. जेणेकरून त्यांना आधार मिळेल. यामध्ये रेशनमध्ये सवलत, शासकिय अनुदान दिले जातील. जोपर्यंत निराधारांची मुले २२ वर्षाची होतात. तोपर्यंत शासनातर्फे सवलत दिली जाते. कोविड व इतर काही अपघातामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावल्या कारणाने निराधारांना कोणत्याही प्रकारची आधार नाही. त्यामुळे आपण सहानुभूतिपूर्वक विचार करून निराधारांना आधार म्हणून पनवेल महानगरपालिकेतर्फे त्यांना मालमत्ता करात विशेष सवलत दयावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.फोटो : विश्वास पेटकर
Comments