भव्य दिव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी :-पनवेल मध्ये महिला उद्योजीकांनी भरविलेले भव्य दिव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे आयोजन शनिवार दिनांक ०२ सप्टेंबर ते रविवार दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत श्री महागणपती मंदिर हॉल, मिडल क्लास सोसायटी, पुरोहित हॉस्पिटल जवळ, पनवेल येथे करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यातील या श्रावणी सोहळ्याचे आयोजन उद्योजिका महिलांनी केले आहे यात विविध वस्तूंच्या विक्रीचे मोठे दालन एकाच ठिकाणी करण्यात आले असून यात खालील वस्तू योग्य दरांत मिळणार आहेत.
१) आयुर्वेदिक गोमय अगरबत्ती, धूप खडा, भीमसेन कापूर, शेण गोवऱ्या, दगडी दिवा, रेडिमेड रांगोळ्या, मोत्यपासून तयार केलेली तोरणं, गणपतीची शाल, गणपती स्वस्तिक, सुपारी, होममेड अत्तर, परफ्युम कापूर कोन, लाकडी छाप रांगोळी ई. पूजेचे साहित्य...
२) फराळ, ओरिजिनल आसाम चहा पावडर, मूग डाळ चकली, नारळ गुळ वडी, अळूवडी, फणस गरे, आंबापोळी, आंबा नारळ करंजी, गुळपापडी
कुंदा, गहू, नाचणी, बाजरी कुकीज, खरवस प्रिमिक्स, मूग डाळ भजी प्रीमिक्स, गोड शिरा प्रिमीक्स, इन्स्टंट सोलकढी, इन्स्टंट कोकम सरबत, इन्स्टंट, बासुंदी, गाईच तूप, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडई, लोणचे, देशी घी, मक्का, बटाटा, नाचणी, डॉलर, पाणीपुरी पुरी, चॉकलेट्स, केक्स, केक पॉपस, चॉकलेट ट्रफल, मावा केक, चोकलेट - ब्राऊन, व्हाईट, डबल लेअर, गुलकंद, स्ट्रॉबेरी, मँगो चॉकलेट, ड्रायफ्रूट,
मोदक - ब्राऊन डबल लेअर, स्ट्रॉबेरी मँगो ई. कोकणी मेवा, चिंच गोळी, फ्लेवर काजू, आगळ, कोकम सरबत, मँगो पल्प, आंबा पोळी, फणस पोळी ई..
३) १ ग्राम ज्वेलरी, पारंपरिक, मोत्याचे दागिने, पेपर ज्वेलरी,सर्व प्रकारची ज्वेलरी
सिल्क, साऊथ सिल्क, पैठणी, गढवाल, लेनिन, कलकत्ता, हॅडलुम सर्व प्रकारच्या साड्या, कुर्ती, वेस्टर्न, लेगिंस, नाईटीज, अंडर गारमेंट, गाऊंस, हर्बल ब्युटी, हेअर प्रॉडक्ट, मेकअप प्रॉडक्ट (डेमो देण्यात येईल) ॲक्सेसरीज, आणि बरंच काही...
४) खाऊ गल्ली:- मोदक, पुरणपोळी, उपवासाची आणि भाजणीची थालिपीठं, घावणे चटणी, अळूवडी, आणि बरंच काही..
वरील सर्व विविध प्रकारच्या वस्तू व आणखी बरेच काही पनवेल येथे दोन दिवसांच्या आयोजनात करण्यात येणार आहे तसेच सर्व नागरिकांनी या महिला उद्योजिकांच्या प्रदर्शनाला व विक्री केंद्राला भेट द्यायचे आवाहन उद्योजिका अपूर्वा प्रभू ( 9892520745 ) यांनी केले आहे.