पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्याची माजी नगरसेवक रविंद्र भगत यांची महापालिकेकडे मागणी...
रविंद्र भगत यांची महापालिकेकडे मागणी... 


पनवेल दि.१० (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेच्या करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात कळंबोली वॉर्ड ऑफिस ठिकाणी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करावी अशी मागणी माजी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
                यासंदर्भात रवींद्र भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कळंबोली वसाहतीच्या घरांची संख्या १ लाख असून पनवेल महानगरपालिकेने करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात ९ ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी कॅम्प आयोजीत केले होते, परंतु नागरीकांपर्यंत याची जनजागृती पुर्णपणे झाली नसल्याने नागरिकांना आपल्या हरकती सादर करण्यास जमले नाही. त्यामुळे कळंबोली वॉर्ड ऑफिस या ठिकाणी पुन्हा १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे.
फोटो : रवींद्र भगत
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image