बाप्पाच्या जयघोषात अभिनव युवक मित्र मंडळाच्या ३३ व्या गणेशोत्सवाच्या मंडपाचे भूमीपूजन संपन्न...
गणेशोत्सवाच्या मंडपाचे भूमीपूजन संपन्न...

पनवेल, दि.२१ (संजय कदम): पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा पायोनिअर विभागातील नवसाला पावणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळाच्या ३३ व्या गणेशोत्सवानिमित्त मंडपाच्या कामाचे भूमीपूजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले आहे.
      यामध्ये अभिनव युवक मित्र मंडळ पनवेल सन २०२३-२४ चे कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश  पाडावे, खजिनदार शैलेश कदम, सचिव सचिन नाझरे, अतिष जोशी, महेश सरदेसाई, संजय कदम, राहुल सावंत, परेश बोरकर, रुपेश नागवेकर, प्रदीप कुंभार, प्रसाद हनुमंते, जॉनी जॉर्ज, छगन परमार, युवराज कदम, मयूर चिटणीस, योगेश पाटील, संदेश फडके, अनिकेत जाधव, दर्शन मनोरे, मंडप डेकोरेटर सुनील कांबरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्रीफळ वाढवून व मंडपाचे पूजन करून बाप्पा मोरयाच्या जयघोषात कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळातर्फे महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, लहानमुलांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, भजन, कीर्तन, बाल्या डान्स, सहस्त्रावर्तन,यांसह बक्षीस समारंभ तसेच श्रींचे आगमन आणि विसर्जन दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
फोटो: अभिनव युवक मित्र मंडळाच्या मंडपाचे भूमीपूजन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते
Comments