पनवेल मध्ये शिवसेनेचा, राष्ट्रवादी व मनसेला धक्का ; दिग्गजांचा पक्ष प्रवेश....


ॲड.प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश

पनवेल दि.२८(वार्ताहर): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन पनवेल शिवसेनेचे महानगर प्रमुख मा.नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल शहरातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश सावंत तथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पनवेल शहराध्यक्ष सिद्धेश खानविलकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
      राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राहिलेले महेश सावंत यांनी यापूर्वी निवडणूक लढवून भरघोस मते घेतली आहेत. पनवेल मध्ये त्यांचा मित्रपरिवार ही मोठा आहे तर अनेक वर्ष मनसेची संलग्न असलेले सिद्धेश खानविलकर यांनी देखील आता शिवसेनेत सक्रिय काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थान येथे जाहीर पक्षप्रवेश केला व त्यानंतर पनवेलमध्ये महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व २८ ऑगस्ट रोजी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचीही पनवेल मध्ये भेट घेतली. यावेळेस खासदार बारणे यांनीही त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. लवकरच पनवेल महानगर व शहर पातळीवर योग्य ते पद देऊन त्यांना जबाबदारी दिली जाईल असे प्रथमेश सोमण यांनी सांगितले.फोटो : पक्ष प्रवेश
Comments