रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ईरशाळवाडीच्या कुटुंबांना मदत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपदग्रस्त मुलांना खेळणी, खाऊचे वाटप....
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलांना खेळणी,खाऊचे वाटप....


नवीन पनवेल ( वार्ताहर) :-  पनवेल येथील रामदास शेवाळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून ईरशाळवाडी येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून जिवन आवश्यक वस्तूंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
इरशालवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या आपद्ग्रस्तांचे कायमस्वरुपी पुर्नवसन होईपर्यंत, डायमंड पेट्रोलपंप, हातनोली, ता. खालापूर येथे स्थापित ताप्तुरत्या निवारा केंद्रात सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 144 आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या केंद्रास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. व येथील सद्या दिलेल्या सुविधा आणि पुनर्वसन कामाचा आढावा घेतला.
ईरशाळवाडी येथील बऱ्याच घरातील करते पुरुष, महिला मृत पावले आहेत. लहान मुलांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत रामदास शेवाळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांना साड्या, पुरुषांना व लहान मुलांना कपडे, फळे व खेळणी वाटप करण्यात आली.या वेळी प्रतिष्ठान च्या माध्यमातून लहानग्यांना मिलिटरी चे युनिफॉर्म व खेळण्यातील बंदुका देण्यात आल्या, त्या मुळे खेळणी पाहून कित्येक दिवसानी या लहानग्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तात्पुरत्या निवारा केंद्र येथे आगमन झाल्यानंतर प्रथमतः त्यांनी निवारा केंद्र येथिल संपूर्ण वसाहतीची पायी फिरुन पाहणी केली. अंतर्गत रस्ते,  पाण्याचे नळ,  शौचालये, घरांची आतील सुविधांचे निरीक्षण केले.  तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुविधा पुरेश्या व समाधानकारक आहेत का याबाबत विचारपूस देखील केली या वेळी मुख्यमंत्र्यांनी रसिका पारधी या बालिकेशीही त्यांनी संवाद साधला यावेळी खा. श्रीरंग बारणे, खा डॉ श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे यांच्यासह 
कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, रामदास शेवाळे रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके, निलेश दिसले,कौलव जाधव,महेश गोडसे,सुधिर ठोंबरे, पंकज सूर्यवंशी,सिद्धेश म्हात्रे,विराट पवार,वैभव लोंडे,दीपक कारंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments