अवैध डिझेल वाहतुक करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात....
अवैध डिझेल वाहतुक करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात.... 


पनवेल दि.१० (संजय कदम) : मांडव्या जवळ समुद्रात रेवस पकटीजवळील रेवस खाडीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या बोटीतुन अवैध डिझेल ची वाहतूक व साठा करणाऱ्या ९ इसमांवर रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने कारवाई करत अटक केली असून त्यांच्याकडून दोन बोटी व त्यामधील हिरव्या रंगाचे डिझेल असा एकूण १ कोटी ३ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
              मांडव्या जवळ समुद्रात बोटीतुन अवैध डिझेल ची वाहतूक व साठा होत असल्याबाबतची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना गोपनीय बातमी होती. त्यानुसार रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना सूचना कडून कारवाईचे आदेंश दिले होते. त्यानुसार शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने मांडवा सागरी पोलीस ठाणे हददीतील रेवस पकटीजवळील रेवस खाडीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या कन्हैया साई आणि श्री गजलक्ष्मी माता बोटीवर कारवाई केली. रसायनी पोलिसांनी आरोपी जियाउल्लख शेख (वय ३५, रा.बेलापुर), दर्शन नाखवा (वय ४०, रा.अलिबाग), कमल बर्मन (वय ३४, रा. अलिबाग), कारू महतो (वय ४१, रा.झारखंड), निसर्ग नाखवा (वय ३१, रा.अलिबाग), निकेश नाखवा (वय २५, रा. अलिबाग), पुनित उरा (वय २९, रा.झारखंड), बिनेय गुरी (वय ३२, रा. झारखंड), प्रेम महातो (वय ४३, रा.झारखंड) यांना ताब्यात घेतले असून दोन्ही बोटींमधून ४६ हजार लिटर हिरव्या रंगाचे डिझेलसह १ कोटी ३ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात अधिक तपास रसायनी पोलीस ठाणेवरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी करीत आहेत.
Comments