अल्पवयीन मुलास कायदेशीर रखवालीतून फुसलावून नेले पळवून....
पनवेल दि.१९(संजय कदम): एक ११ वर्षीय मुलास अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता कायदेशीर रखवालीतून नेले फुसलावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील पेंधर गाव येथे घडली आहे.
विकास कुशियाली अनुरागी (वय ११ वर्ष १ महिना) अंगाने मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, डोळे काळे व मोठे, केस काळे, कपाळावर जुन्या जखमेची खुण, अंगात निळया रंगाचे शर्ट व काळया रंगाची हाफपॅन्ट आहे. या मुलांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे किंवा सहायक पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे) यांच्याशी मो.नं. ८७८८२८६०६४यावर संपर्क साधावा
फोटो: विकास अनुरागी