रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी आणि पालकांना मोफत हेल्मेटचे वाटप....
              मोफत हेल्मेटचे वाटप....


पनवेल दि.२६(संजय कदम): पनवेल तालुक्यातील आजिवली येथील जनता विद्यामंदिर व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे रस्ते सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन व आय सी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स यांच्या वतीने दुचाकी स्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे.
      महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील जनता विद्यामंदिर अजिवली व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अजिवली या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र राज्य अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेने  महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग घनश्याम पालंगे तसेच महामार्ग पोलीस पनवेल विभाग गौरी मोरे यांचे मागदर्शनाखाली महामार्गावर होणारे अपघात त्याचे कारणे व परिणाम तसेच सदर अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता त्याअनुषंगाने रस्ते सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन व आय सी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स यांच्या वतीने विद्यालयात मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.  या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी मोटर सायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने व तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करावा, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट चा वापर करू नये, मोटरसायकल चालविताना धोकादायकरित्या वाहन चालवू नये, मोटरसायकल चालविताना मोबाईलवर संभाषण करू नये, मोटरसायकल चालविताना कोणत्याही प्रकारचे मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, मोटर सायकल चालवणारा व्यक्ती हा कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेला असावा, 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास पालकांनी देऊ नये, तसेच वाहन चालवताना आपली स्वतःची काळजी घ्यावी, वाहन चालक यांनी महामार्गावर दिलेल्या वाहतूक चिन्हांचे व सूचनांचे अनुसरून वाहन चालवणे व वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, अपघातामधील व्यक्तींना तात्काळ योग्य ती मदत पुरवून झालेल्या अपघाताबाबत 100/108 /8652085500 या क्रमांकावर कॉल करून घटनेबाबत माहिती द्यावी, रस्ता ओलांडताना पादचारी यांनी फुटपाथ अथवा भुयारी पूलाचा वापर करावा व रस्त्याचे आजुबाजुचे वाहन पाहून सुरक्षित रस्ता ओलांडावा, पावसाळ्यात वाहने  स्लीप होण्याची शक्यता असते त्यामुळे वाहने सावकाश चालवावी या वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करून उपस्थित असलेल्या 73 विद्यार्थी आणि 73 पालक यांना एकूण 146 मोफत हेल्मेट वाटप करून जनजागृती व प्रबोधन केले.यावेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी गणेश बुरकुल, स्कूल कमिटी चेअरमन राजेंद्र पाटील, सेवा सहयोग फाउंडेशन चे प्रोजेक्ट मॅनेजर संदेश घरत, शुषमा शिंदे, जयश्री सानप, लक्ष्मी माळी. धनंजय, विद्यालयाचे प्राचार्य डी.बी चवरे, श्री.ससाणे, श्री.भगत व पालक, विद्यार्थी आणि उपस्थित होते.



फोटो : हेल्मेट वाटप
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image