पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते गणेशोत्सव आगमनापुर्वी दुरुस्त करावेत ; युवासेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरपालिकेकडे मागणी..
युवासेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरपालिकेकडे मागणी..


पनवेल दि.२९(संजय कदम): युवासेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व खारघर शहरातील खड्डेमय रस्ते गणेशोत्सव आगमनापुर्वी दुरुस्त करावेत अशी मागणी वासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राउत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
पावसाळयामुळे पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांचा मुळे चाळण झाली असुन सर्व नागरीकांना रोज वाहतुकीकरता त्रास सहन करावा लागत आहे सोबतच गणेशोत्सव तोंडावर आला असल्यामुळे गणेश भक्तांना याचा त्रास सहन करावा लागु शकतो त्यामुळे नागरीकांच्या व गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्वरीत रस्ते दुरुस्ती करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राउत, प्रभाग अधिकारी निखिल पानमंद, युवासैनिक अश्विन ससाने, अविनाश जाधव, सत्यपाल पवार यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.
फोटो: रस्ते दुरुस्ती निवेदन
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image