तिच्या अस्तित्वाचा सन्मान ! ध्वजारोहणाचा तिला मान !
पनवेल / वार्ताहर :- शेतकरी कामगार पक्ष कामोठे यांनी दरवर्षीप्रमाणे स्वतंत्रता दिन १५ ऑगस्ट ध्वजारोहणाचा मान महान सामाजिक संदेश देत समाजातील प्रमुख घटक असलेल्या घर सेवा देणाऱ्या शेकडो महिलांच्या उपस्थितीत सेवाकरी दिपाली फडतरे यांना दिला. समाजामध्ये स्वतंत्रता दिन साजरा करताना संवेदनशील आदरार्थी भावनेतून शे का पक्षाचे कामोठे कार्याध्यक्ष गौरव भाई पोरवाल व उपाध्यक्ष नितीन पगारे अन्य कामोठे पदाधिकारी यांनी मागच्या वर्षी स्वच्छता धुताना ध्वजारोहणाचा मान दिला होता. यावर्षी हा मान घर सेवा देणाऱ्या सेविकेच्या हस्ते करण्यात आल्याने शहरात शेकापच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आयोजकांच कौतुक होत आहे.
संविधानाच्या माध्यमातून सर्व कर्तव्य , स्वतंत्रतेच्या जाणीवा आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या बऱ्याचशा प्रमाणात आपण टिकवण्याचा वाढवण्याचाही प्रयत्न करतोय पण सर्वसामान्य नागरिक जोपर्यंत जागरूक होत नाही ,तोपर्यंत आपल्याला आपले अधिकार, आपला मान, आपला सन्मान मिळणार नाही त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी जागरूक होणे संघटित होणे महत्वाचे आहे. कामोठे शहर शेकापच्या माध्यमातून कष्टकरी, गरजू, इमानदार ,विश्वासू अशा समाजातील प्रमुख घटक असलेल्या घरसेवा देणाऱ्या शेकडो स्त्रियांचा गौरव पोरवाल आणि त्याचे सर्व सहकारी वर्गाने सन्मान करून समाजाने अनुकरण करावे अस राज्याच्या, राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कार्य ही सारी मंडळी करत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.संकट काळी कधीही मदत लागल्यास मी व माझा पक्ष सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असा विश्वास देतो . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनव पध्दतीने कार्यक्रम केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानतो असे प्रतिपादन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा देणाऱ्या असंख्य महिलांना यावेळी सन्मान करून तुळशी रोप, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात आले.
कार्याध्यक्ष पोरवाल यांनी मातृत्व म्हणून जगाच अस्तित्व जपणारी स्त्री सशक्त असून देवी तुल आहे, तिचे अनेक ऋण मानव जातीवर आहे तिला सन्मान देणे आपलं कर्तव्य असून निडर पणे स्त्रियांनि अन्यायाशी लढावं व त्यासाठी शेकाप व आम्ही सर्व सदैव त्यांच्या सोबत आहोत. माझ्या विनंतीला मान देऊन अनेक घर सेविका , सदनिका धारक,पक्ष ,संघटना व अनेक सहकारी मित्रांनी एका अनोख्या स्वतंत्र दिना निमित्ताने ७६ वा स्वतंत्रता दिन साजरा करताना वृक्ष रोपण ,जेष्ठ नागरिक सन्मान हर घर तिरंगा असे अनेक उपक्रम राबविले असल्याचे म्हणत सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, प्रमोद भगत ,कार्याध्यक्ष गौरव पोरवाल ,उपाध्यक्ष नितीन भाऊ पगारे ,सुरेश खरात, अल्पेश माने,तुकाराम औटी,अनिल हडवळे, सचिन झणझणे, उषा झणझणे, शुभांगी खरात शेकडो घर सेविका व विविध सोसायटीचे सदस्य, महिला ,जेष्ट नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.