विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईचा पनवेल वाहतूक शाखेचा इशारा....
कारवाईचा पनवेल वाहतूक शाखेचा इशारा....

पनवेल दि.१३ (संजय कदम) : विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला. 
पनवेल शहरासह तालुक्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बहुतांश वाहने नियमांना बगल देत विनापरवाना, विनानोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेत असल्याच्या तक्रारी पनवेल वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार पनवेल वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला. त्याचप्रमाणे वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वाहतूक शाखा सकारात्मक असल्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री हुंबने तसेच इतर वाहन चालक व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  फोटो : पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना
Comments