पनवेल मध्ये मुसळधार पावसात शिवसैनिकांचे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मदत कार्य....
 प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मदत कार्य....

पनवेल / वार्ताहर  : -
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. पनवेल शहरातही पावसाची फुल बॅटिंग चालू असताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचू लागले. शिवसेना महानगरप्रमुख, मा. नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, उपविभाग प्रमुख नंदकुमार मांढरे, शाखाप्रमुख किरण कळवेकर, किरण पवार, प्रतीक वाजेकर, रोहित भोईर, अभिनय सोमण, संदीप शेवाळे व इतर शिवसैनिकांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत कार्य केले. 

टपाल नाका, कुंभारवाडा या ठिकाणी पाहणी करून कामगारांकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर खुले करून घेतले, मिडल क्लास सोसायटीतून जात असताना तिथे मोठा साप निघाल्याचे स्थानिकांनी सांगताच सर्पमित्र अर्केश कुलकर्णी यांना पाचारण करून शहर संघटक अभिजीत साखरे या दोघांनी स्वतः त्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले.तसेच 52 बंगला परिसरात दोन ठिकाणी भरपूर पाणी साठलेले आढळले व तेथे कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. इमारतीच्या तळमजल्यातील घरात पाणी शिरले होते. भयभीत नागरिकांना सोसायटीच्या बाहेर पडण्यासही कोणता वाव नव्हता. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिथे बोलवून घेतले. आणखी एका सक्शन पंपाची गरज आहे हे कळल्यावर टेम्पोची व्यवस्था करून दुसऱ्या विभागातून महापालिका कर्मचाऱ्यांची वाट न बघता स्वतः सर्व शिवसैनिकांनी पंप उचलून सोसायटीत आणला व तेथील वॉटर लॉगिंग ची समस्या ताबडतोब दूर केली. त्यानंतर पाण्याचा निचरा झाल्याची पडताळणी करण्यासाठी नंतरही पदाधिकारी स्वतः जाऊन जागेची पाहणी करून आले. आज खालापूर तालुक्यात गंभीर घटना घडल्यावर स्वतः जातीने एका कार्यकर्त्याप्रमाणे काम करणाऱ्या मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंचा वारसा चालवणारे प्रत्यक्ष रस्त्यात उतरून काम करणारे आम्ही खऱ्या शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक आहोत अशी प्रतिक्रिया प्रथमेश सोमण यांनी दिली. व यापुढेही पावसाळा सुरू असेपर्यंत कोणतेही सहकार्य लागल्यास आम्हाला संपर्क करण्याचे आवाहन शहरप्रमुख प्रसाद सोनवणे यांनी केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image