जनतेची इच्छा पालकमंत्री भरत गोगावले व्हावे हीच आहे : शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण
शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण..

पनवेेल, दि.10 (वार्ताहर) ः राज्यात शिवसेना-भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर रायगड मध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा शंका कुशंका निर्माण होऊ लागले आहेत. अशातच आदिती तटकरे या पुन्हा एकदा पालकमंत्री व्हाव्यात अशी जनतेची इच्छा असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पनवेल पदाधिकार्‍यांनी सांगितले परंतु शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी त्याला उत्तर दिले आहे. जनतेची इच्छा राष्ट्रवादीचा मंत्री व्हावा ही असती तर रायगड जिल्ह्यात युतीचे पाच आमदार निवडून आले नसते असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे तीन, भारतीय जनता पक्षाचे दोन तर भाजपच्या पाठिंब्यावर एक अपक्ष आमदार निवडून आला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद भरतशेठ गोगावलेंनाच मिळावे ही फक्त आमची मागणी किंवा इच्छा नव्हे तर भरतशेठ यांचा तो हक्क देखील आहे असे सोमण यांनी सांगितले. आदिती ताई तटकरे यांचे सरकारमध्ये स्वागतच आहे , तटकरे साहेबांच्या अनुभवाचा जिल्ह्याच्या विकासासाठी निश्‍चित फायदा होईल परंतु शिवसेनेचे जिल्ह्यातील भरत शेठ गोगावले हे जुने जाणते नेते असून भरघोस मतांनी निवडून येणारे जेष्ठ आमदार आहेत. जिल्ह्यात अनेक विकास कामांत व पक्ष वाढीमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 
आम्ही पदाधिकारी -कार्यकर्ते निव्वळ घोषणेच्या प्रतीक्षेत आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात गोगावले साहेब लवकरच मंत्रीपदी विराजमान होतील. निव्वळ एक नवनिर्वाचित आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पालक मंत्रिपदावर दावा असू नये. असल्यास तो सेना - भाजप ला भरगोस मते दिलेल्या रायगडकर युतीच्या मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मिळून मिसळून काम करावे परंतु शिवसेनेचा दावा आणि हक्क असणार्‍या या पालकमंत्री पदाच्या विषयात शिवसेने विरोधात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी बोलू नये असे विनंती वजा आवाहन प्रथमेश सोेमण यांनी शिवसेनेच्या वतीने केले.




फोटो ः भरत गोगावले आणि प्रथमेश सोेमण
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image