मनसेतर्फे आदिवासी पाड्यांत छत्र्यांचे वाटप...
पनवेल / (वैभव लबडे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुकातर्फे खानावळे वाडी, साई, केळवणे या आदीवासी पाड्यात पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी तालुका सचिव अमोल पाटील, तालुका उपाध्यक्ष कैलास माळी, नरेंद्र मोकल, पोयंते विभाग अध्यक्ष दशरथ मुंढे, खानावळे शाखा अध्यक्ष आकाश पाटील, भाताण शाखाध्यक्ष विजय ठाकूर, सचिन मोकल, रमेश पाटील, राजु घरत, प्रविण ठोंबरे, संतोष पाटील, गणेश जुमारे, वावेघर शाखाध्यक्ष अर्जुन राठोड, अजित गायकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रामदास पाटील यांनी आदिवासी बांधवाच्या प्रश्नांसंदर्भात विचारले असता खानावळे वाडीतील महिलांनी त्यांच्या समस्या सांगताना आम्हाला घरकुळ योजनेचा लाभ अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले तसेच पाणी प्रश्नाबाबत ही त्यांनी उल्लेख केला. पाटील यांनी याबाबत आपण लवकरच संबंधित अधिका-यांशी बोलून पाठपुरावा करुन प्रश्न मागी काढण्याचे आश्वासन दिले.