शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली उपशहरप्रमुख पदी संजय भालेराव ....
कळंबोली उपशहरप्रमुखपदी संजय भालेराव ....

पनवेल दि.२५ (संजय कदम) : माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली उपशहरप्रमुखपदी संजय भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र संजय भालेराव यांना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्या हस्ते देण्यात आले. 
                शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्या सहकार्याने कळंबोली उपशहरप्रमुखपदी संजय भालेराव यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्या हस्ते संजय भालेराव यांना देण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख महेश गुरव, कपिल जमदाडे, कळंबोली शहर महिला संघटक ज्योती मोहिते, महिला संपर्कप्रमुख सौ. शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सूर्यकांत म्हसकर यांनी सांगितले कि, उपशहरप्रमुख म्हणून काम करत असताना, आपणांकडून काही बाबींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. यामध्ये पक्षाचे संघटनात्मक कार्य करताना, संघटनेच्या हिताची जपणूक करणे, संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. संघटनेला व संघटनेच्या प्रतिष्ठेला आपणामुळे डाग लागणार नाही याची खबरदारी घेऊन आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निर्णय घेतेवेळेस जिल्हामध्यवर्ती, शहरशाखा कार्यालयांशी संपर्क साधण्याचा सल्ला संजय भालेराव याना सूर्यकांत म्हसकर यांनी दिला आहे. 

फोटो : संजय भालेराव यांना नियुक्तीपत्र देताना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर व इतर पदाधिकारी
Comments