इन अँड आउट स्टोअरचे उद्घाटन..
पनवेल: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांच्या किरकोळ विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याच्या BPCL च्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, BPCL च्या रिटेल आउटलेट M/S अमोल ऑटो येथे इन अँड आउट स्टोअरचे पनवेल तालुक्यातील शेडूंग येथे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये लोकांना आणि ग्रामीण भागातील लोकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार ब्रँडेड घरगुती वस्तू उपलब्ध करून देणे या हेतूने भारत पेट्रोलियमने ग्रामीण भागात तालुका स्तरावर अमोल ऑटो शेडूंग येथे रिटेल आउटलेट दुकाने उघडले आहे. ज्यामध्ये उर्जा देवी यांचीही गावपातळीवर नियुक्ती करण्यात आल्या आहे.
या उद्धाटन प्रसंगी भारत पेट्रोलियमचे पी.एस. रवी ईडी [कॉर्पोरेट संस्था], अनिल कुमार पी ईडी [GAS], शुभंकर सेन, हेड [रिटेल] वेस्ट, बिजू गोपीनाथ, प्रमुख [नवीन व्यवसाय], राकेश के. सिन्हा, राज्य प्रमुख [रिटेल] महाराष्ट्र आणि गोवा, उमेश कुलकर्णी, टेरिटरी मॅनेजर [रिटेल] मुंबई, हजर होते तसेच भारत पेट्रोलियमचे कर्मचारी व पनवेल परिसरातील मान्यवर उपस्थित होते.