आदिवासी पाड्यात शिधा वाटप....
पनवेल दि.३१ (संजय कदम) : पनवेल मधील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंर्तगत आदिवासी बापदेव वाडी, गाढेश्वर येथील ३५ कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आले.
बांधकाम व्यावसायिक व कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापदेव वाडी समाज मंदिरात ३५ कुटुंबांना तांदुळ, डाळ, तेल व इतर वस्तु आदी शिधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर, उपाअध्यक्ष नंदा नाईक, सचिव यतीन ठाकुर, खजिनदार विनायक तिरोडकर व कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण, पनवेलचे सर्व सभासद यांच्यासह बापदेव वाडीतील पुरुष, महिला तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडळातर्फे वाडीसाठी लोकांच्या गरजा ओळखून त्याना भविष्यातही अशा प्रकारची मदत करु असे सांगीतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी प्रभु यांनी केले.
फोटो : कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातर्फे आदिवासी पाड्यात शिधा वाटप