जाणीव एक सामाजिक संस्था व मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हिलींग द्वारे उपचार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद ..
हिलींग द्वारे उपचार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..


पनवेल दि. ०२ ( वार्ताहर ) :   जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच मोफत हिलींग द्वारे उपचार शिबीर बल्लाळेश्वर मंदिर सभागृह, वीर सावरकर चौक, येथे संपन्न झाले या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे .                                             प्राणिक हिलींग ही नो टच, नो मेडिसिन यावर आधारित आहे. ही उपचार पद्धत कित्येक वर्षे भारतातच नाही तर इतर अन्य देशातही सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव एक सामाजिक संस्था चे संस्थापक, अध्यक्ष मा नितीन जयराम पाटील यांच्या तर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्राणिक हिलींग सेंटरच्या प्रमुख हिलर सौ मेघना कदम आणि सई कुळकर्णी व आशिष सावंत यांनी सांगितले की  आपल्याकडे नवी मुंबई सह पनवेल मधीलही अनेक नागरिक उपचार घेत असून पनवेलवासियांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले व यासाठी जाणीव या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नितीन पाटील यांचे व  प्रसाद हनुमंते यांचे विशेष आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर शिबिरास  पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

फोटो -  हिलींग द्वारे उपचार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Comments