वपोनि विजय कादबाने यांनी स्थानिक शेतकऱ्यांचे मत परिवर्तन केल्याने विरार- अलिबाग कॉरिडॉरची मोजणी प्रक्रिया शांततेत पार....
विरार- अलिबाग कॉरिडॉरची मोजणी प्रक्रिया शांततेत पार....  


पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी स्थानिक शेतकऱ्यांना समजावून त्यांचे मत परिवर्तन केल्याने विरार- अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका प्रकल्पातील वडवली व कुडावे गाव येथील मोजणी प्रक्रिया शांततेत पुर्ण झाली. 
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका प्रकल्पाचे अनुषंगाने पनवेल तालुक्यातील वडवली व कुडावे गाव येथील भूमी अभिलेख पनवेल यांचे मार्फत जमीन मोजणी आज पार पडणार होती. यासाठी भूमी अभिलेख अधिकारी आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास सक्त विरोध केला. सदर ठिकाणी मोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाणेमार्फत योग्य तो पोलीस  बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. मोजणीवेळी स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. मात्र पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी स्थानिक शेतकऱ्यांना समजावून त्यांचे मत परिवर्तन केल्याने मोजणी प्रक्रिया शांततेत पुर्ण झाली. 
फोटो : विरार- अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका मोजणी प्रक्रिया
Comments