तळोजा येथिल कमळ गौरी हिरू पाटील संस्थेचे दहावीच्या परिक्षा निकालात दैदीप्यमान यश...
तळोजा येथिल कमळ गौरी हिरू पाटील संस्थेचे दहावीच्या परिक्षा निकालात दैदीप्यमान यश...

पनवेल दि.०३ (संजय कदम) पनवेल तालुक्यातील तळोजा येथील कमळ गौरी हिरू पाटील संस्थेने दहावी परीक्षेच्या निकालात दैदीप्यमान यश संपादित केले आहे.   
यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल (स्टेट बोर्ड) निकाल १०० टक्के लागला आहे. या मध्ये आयुष्य पाटील ९०.६०% आदित्य शिंदे (८७.८०%) व सिद्धी कोळी (८७.६०%) तसेच कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालय तळोजे मजकुर चा निकाल १००% लागला आहे त्यामद्ये कु. श्रुष्टि भोईर(८९.८०%), तनिषा पाटील(८९%) व नितेश मुंबईकर(८४%) त्याचप्रमाणे संस्थेच्या अनुसया पाटील माध्यमिक विद्यालयाचाही निकाल १०० टक्के लागला असून त्यामध्ये महेक अमीन पठाण(७४%), आयेशा निसारखा पठाण (७१.६०%) व पियुष म्हात्रे(७०.६०) मिळवले आहेत. संस्थेच्या तीनही शाळानी १००% यश मिळवत पुन्हा एकदा संस्थेच नाव उंचावल्याबद्दल संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी तसेच पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो : बबनदादा पाटील
Comments