रिपब्लिकन सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी संतोष पवार यांची नियुक्ती...
रिपब्लिकन सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी संतोष पवार यांची नियुक्ती...
पनवेल/ प्रतिनधी
गेली १० वर्षे  लोक जनशक्ती पार्टीच्या रायगड जिल्हाअध्यक्ष पदी पक्षाचे  राजकारणा पेक्षा समाज कार्य करणारे संतोष पवार यांची नुकतीच रिपब्लिक सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी रायगड जिल्हाअध्यक्ष पदी  यांची नियुक्ती केली आहे .रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ,प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे,युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या प्रमुख उपस्तिथीत पवार यांना नियक्ती पत्र देण्यात आले .
गेली दहा वर्षे लोक जनशक्ती पार्टीच्या रायगड जिल्हाअध्यक्ष  पदी संतोष पवार काम पाहत होते पक्षात मन रमत नसल्याने आणि सरसेनानी आनंदराज अंबेडकर यांच्या कार्याला प्रेरित होऊन संतोष पवार यांनी नुकताच रिपब्लिकन सेनेत  प्रवेश केला होता पक्षाने त्यांच्या वर रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून पक्ष वाढी साठी आणि आंबेडकर  चळवळीसाठी मेहनत घेऊन काम करेल असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले
Comments