माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी गटामध्ये पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक...
पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक...
पनवेल, दि.6 : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी,जल,वायू,अग्नी,व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेअंतर्गत  ३ ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरामध्ये पनवेल महानगर पालिकेला राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झालाअसून रूपये ५ कोटीचा पुरस्कार दिनांक ५ जून रोजी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या ‘माझी वसुंधरा ३.० सन्मान  सोहळ्यात’  मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
सदर प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य् उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, पर्यावरण् विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,यांची प्रमुख उपस्थिती होते. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ ,उपायुक्त कैलास गावडे , विठ्ठल डाके , गणेश शेटे ,प्रकल्प कार्यकारी अभियंता  संजय काटेकर , पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण  उपस्थित होते. 
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन,संरक्षण व जतन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने  केलेल्या कामगिरीबाबत महापालिका आयुक्त यांनी पर्यावरण विभागचे उपायुक्त कैलास गावडे यांचे अभिनंदन केले.

निर्सगातील पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचही अस्तित्व राहणार नाही. म्हणूनच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून तेथे निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अबलंबविण्यासाठी  ‘माझी वसुंधरा’ हे अभियान दिनांक २ ऑक्टोबर, २०२० रोजी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आले. याअभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित विविध उपक्रम महापालिका राबवित आहे.

        माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत नागरिकांमध्ये पर्यावरण बद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने  गेल्यावर्षभरापासून पर्यावरण विभागाचे उपायुक्त कैलास गावडे आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध  कार्यक्रम राबवित आहेत. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक घरगुती,सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.याचबरोबर मॅरेथॉन, स्वच्छता रॅली ,सायकल रॅली घेण्यात आली. पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा,  लघुगीत , निबंध, टाकाऊ पासून टीकाऊ , गच्ची वरील बाग, घर किंवा सोसायटी स्तरावर कंपोस्टींग तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याचबरोबरीने तलावांची साफ सफाई, वृक्षारोपण, नदी प्रदुषण या  विषयी जनजागृती करणेकामी  शाळा कॉलेजमध्ये सेमीनार घेण्यात आले. याचबरोबर नुकतेच पनवेल महानगरपालिका आणि भारत विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमानातून सिंगल युज प्लास्टिक विरोधात अभियान सुरू करण्यात आले आहे.

पालिकेचा पर्यावरण विभाग करत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शासनाने हा पुरस्कार महापालिकेस प्रदान केला असून आयुक्त गणेश देशमुख यांनी पर्यावरण विभागाच्या टिमचे कौतुक करून येत्या काळात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम राबविण्यावर भर देण्याबाबत सुचविले आहे.
Comments