कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे पोलिसांचे आवाहन ....
 
पोलिसांचे आवाहन ....


पनवेल दि. १० ( संजय कदम  ) : कामोठे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात सन २०१९ ते सन २०२० या कालावधीत असलेली बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे . 
                    त्यामध्ये दुचाकी वाहन बजाज डिस्कवर एम.एच ०६ - १९२१, हिरो होंडा स्प्लेंडर एम. एच ०३, डब्लु. २४१९,हिरो होंडा स्प्लेंडर  एम.एच ०४, बीई ७५१३,बजाज एक्ससीडी १२५एम.एच ०४, एवाय. ९८६२,  बजाज   कॅलीबरएम. एच ०२, एएफ.८८१७,पल्सर एम.एच ०८, एम. ९७००, यामाहा कंपनीची मोटारसायकल डीएल.९, एसएन. २८०३,पल्सर एम.एच ०४, एम २४६६, टिव्हिएस स्कुटी के.अ. २५, यु.५२१५, बजाज अशी  बेवारस वाहने मिळून आलेली आहेत - नमूद वाहन मालकांचा शोधतपास करण्यात आला. परंतु कोणीही वाहन मालक मिळून आलेले नाही. नमूद बेवारस वाहनांच्या मालकांचा शोधतपास होणेकामी अथवा त्यांची सदरची वाहने ओळख पटणेकामी  कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. तरी बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे .
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image