डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल....
आक्षेपार्ह मजकूर - गुन्हा दाखल....


पनवेल दि.२५ (वार्ताहर) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल  करणाऱ्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            ट्विटर या सोशल मीडियावर ‘पापा पापी Ashu87987’ आणि ‘जगो कफिरो’ या अकाउंट धारकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर व्हायरल केल्याची पोस्ट फिर्यादी ऍड. अमित कटारनवरे यांच्या निदर्शनास आली. संबंधित पोस्टची स्क्रिनशॉट काढून त्यांनी या ट्विटरधारकांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याविषयी अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
Comments