अमली पदार्थाचे सेवन करताना तरुणास अटक..
अमली पदार्थाचे सेवन करताना तरुणास अटक..



पनवेल दि.३१ (संजय कदम) : तळोजा फेज ०२ येथील मोकळ्या मैदानामध्ये अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर तळोजा पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळील अमली पदार्थ जप्त केले आहे. 
            नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तळोजा पोलिसांना आरोपी नलिन नरेशकुमार रैना (वय २८ वर्षे, रा. प्रथमेश होम्स, प्लॉट नंबर १३, १४, सेक्टर २३, तळोजा फेज २, मुळ रा. कामधेनु होम्स, अक्कनुर रोड, शिवनगर, जि.जम्मू राज्य जम्मू कश्मीर) हा तरुण गांजा हा अंमली पदार्थांचे सेवन करताना मिळून आला. तळोजा पोलिसांनी त्याच्याकडून लालसर रंगाची गांजाने भरलेली अर्धवट जळालेली मातीची चिलिम व प्लॉस्टीकची गांजाची पुडी जप्त केले आहे. याप्रकरणी सदर तरुणावर अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क). २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image