के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांकरीता “मोफत” वाचनाची सुविधा...
के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांकरीता “मोफत” वाचनाची सुविधा...
         
पनवेल / प्रतिनिधी : - 
इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरीता वाचनालयात, सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत पुस्तक वाचनाची सुविधा ‘विद्यार्थी कक्षात ‘ उपलब्ध करून देणेत आली आहे. ही सुविधा दिनांक २/०५/२०२३ ते १५/०६/२०२३ या कालावधीसाठी असणार आहे.

कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असलेल्या व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाबाबतची पुस्तके वाचनालयातील “ विद्यार्थी कक्षात “ सकाळी ८.30 ते रात्री ८.०० या वेळेत वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देणेत येत आहेत. ही सुविधा दिनांक २/०५/२०२३ ते १५/०६/२०२३ या कालावधीसाठी असणार आहे.

वाचनासाठी उपलब्ध करून दिलेली पुस्तके घरी नेता येणार नाहीत. कॉलेज विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा ही वाचनालायातर्फे विनंती करण्यात आली आहे.तसेच सोमवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने वाचनालय व ग्रंथालय बंद राहणार असल्याचे वाचनालया तर्फे कळविण्यात आले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image