पनवेलमध्ये एकाच वेळी दहा पुस्तकांचा महाप्रकाशन सोहळा....
पनवेलमध्ये एकाच वेळी दहा पुस्तकांचा महाप्रकाशन सोहळा....


पनवेल दि.३१ (वार्ताहर) : ज्येष्ठ नागरिक सभागृह, ठाणे नाका पनवेल येथे ४ जून रोजी एकाच वेळी दहा पुस्तकांचा महाप्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता पार पडणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन नसिमा फाऊंडेशन आणि गजलग्रुप, पनवेल यांच्या द्वारे करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गजलनवाज भीमराव पांचाळे भूषविणार आहेत.
            स्वप्न, स्वप्न झुला, लळा जिव्हाळा, माझे गर्भाशय, पुन्हा एकदा, रंग-बिरंगी, मनाचे किनारे, रात्र पावसाची, दीवान-ए-के आणि मी योजिले मनाशी, या दहा पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यास माजी खासदार रामशेठ ठाकूर, 'पनवेल'चे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, माजी आयुक्त दिलीप पांढरपट्टे, उपायुक्त संदीप माळवी, प्राचार्या डॉ. रमा भोसले हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचा मुशायराही पार पडणार आहे. , असे आयोजकांतर्फे गझलकार ए. के. शेख यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
Comments