पनवेलच्या निसर्ग मित्रांचे श्रमदान : प्रबळगड माचीवरील बंधारा केला साफ....

प्रबळगड माचीवरील बंधारा केला साफ....

 


पनवेल / वार्ताहर : निसर्गमित्र पनवेलच्या २  दिवसीय श्रमदानात प्रबळगड माची वरील मठाजवळील बांधलेला बंधारा साफ करण्यात आला. या ठिकाणी बारमाही छोटा झरा असून त्या बंधाऱ्यात पाणी जास्त साठावे या करीता त्यातील गाळ- माती व दगडे काढण्यात आली.      

       बंधाऱ्यातील पाण्याचा वापर वाडीतील लोकांना होतो तसेच प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.या व्यतिरिक्त फुटलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी परत दगड -माती रचून बांध घातला व मठाजवळील पाण्याचे कुंड देखील साफ करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या तरुण मुला मुलींनी खूप मेहेनत घेतली. त्या मध्ये क्षितिज जाधवअनिष मेंदर्गीदीप्तन्शु चव्हाणयाना कोकणेदर्शन पाटीलशैलेंद्र पाटीलराज इंडवटकरअनुजा काजरेकरमृण्मयी मुळेमानस शहासने व इतर अनेक मुला-मुलींचा सहभाग होता.

Comments