आमरसमुळे झाला पनवेल-सायन महामार्ग जाम...
आमरसमुळे झाला पनवेल-सायन महामार्ग जाम...     
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल- सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या रिक्षामधील आमरसाने भरलेली अंदाजे पाच ते दहा किलो वजनाची आमरसाची पिशवी रस्त्यावर सांडल्याने रस्त्यावर आमरस पसरले. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ पनवेल- सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
             सायन-पनवेल महामार्गावरील कामोठा ब्रिजवर पाच ते सहा वाहने घसरून पडले. हा प्रकार ऑइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, रस्त्यावर आमरस सांडल्याची बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब वाहतूक पोलिसांना कळवण्यात आली होती. या वेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणी माती टाकून वाहतूक सुरळीत केली होती.




फोटो : आमरसमुळे पनवेल-सायन महामार्गवर वाहतूक कोंडी
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image