रेल्वे स्थानकात झोपी गेलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास...
रेल्वे स्थानकात झोपी गेलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास...


पनवेल दि.१८ (वार्ताहर) : रेल्वे स्थानकात झोपी गेलेल्या प्रवाशाने पोटावर ठेवलेला मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना पनवेल स्थानकात घडली. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             स्वप्निल पहिलवान हा पहाटेच्या सुमारास मुंबईतून पनवेलला जात असताना पनवेल स्थानकात त्याला झोप लागली. यामुळे मोबाइल पोटावर धरूनच तो झोपला होता. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्याचा मोबाइल चोरून धूम ठोकली. थोड्या वेळाने त्याला जाग आल्यानंतर मोबाइल मिळून आला नाही. याबाबत स्वप्नीलने पनवेल रेल्वे ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments